पिंपरी, दि. २४.( punetoday9news):-  सकाळच्या प्रहरी घरोघरी जाऊन पांडुरंगाची अभंग, गवळणी, गात “दान पावले,दान पावले”,म्हणणारा लोककलाकाराची कोरोना महामारीमुळे उपासमारीची वेळ आली आहे.

डोक्यावर मोरपीस, पायघोळ अंघरखा,
धोतर, एका हातात टाळ,चिपळया,कमरेला पावा,गळ्यात झोळी ,कवडयांची माळ,असा पेहराव करून,”वासुदेव हरी, वासुदेव हरी । सकाळच्या पारी वासुदेवाची स्वारी। ” असे गाणे म्हणत म्हणत फिरत असतात.सध्या पाश्चिमात्य संस्कृती मुळे भारतीय लोककला लुप्त होत चालली आहे.
पुर्वीच्या काळी वासुदेव दारात येणे म्हणजे श्रीकृष्ण घरी आल्याचा आनंद होत असे लहान मुले व वयोवृद्ध ही नमस्कार करत व आर्शिवाद घेत असत.घरातील महीलाही सुपात धान्य घेऊन वासुदेवास देऊन आर्शिवाद घेत असे.
कोरोना महामारीमुळे वासुदेव दिसेनासे झालेत तर काही वासुदेवावर उपासमारीची वेळ आली आहे.

सध्या कोरोना मुळे कोणी ही आर्थिक व धान्याच्या रुपात मदत करत नाहीत. असे सकाळच्या प्रहरी आलेल्या धनाजी गोधे व प्रविण वाईकर यांनी सांगितले. आम्ही ही लोककला लहापणापासुन जपली आहे. असे त्यांनी सांगितले त्यांना सरकार च्या मदतीची गरज असल्याचे मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी सागितले.

 

Comments are closed

error: Content is protected !!