बँगलोर,दि.२४(punetoday9news):- स्ट्रॅटेजिक फोर्स कमांड, भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने डिझाइन केलेले कमी पल्ल्याच्या ‘पृथ्वी’ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.

बुधवारी ओडिशाच्या बालासोर किनाऱ्यावरून या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्राने एसएफसीने ठरवलेल्या आपल्या मोहिमेचा प्रत्येक उद्देश पूर्ण केला.

▪️ 350 किलोमीटरपर्यंत मारा करणारे हे क्षेपणास्त्र आयटीआरच्या परिसर-3 मध्ये मोबाईल लाँचरद्वारे सोडण्यात आले  .

▪️ पृथ्वी हे पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे कमी पल्ल्याचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे.

▪️ हे क्षेपणास्त्र सुमारे 150 किलोमीटर ते 600 किलो मीटरपर्यंतचा पल्ला गाठू शकतं. पृथ्वी या सीरिजची तीन क्षेपणास्त्र आहेत.

▪️ पृथ्वी-1, 2, 3 ही क्षेपणास्त्र असून त्यांची मारक क्षमता अनुक्रमे 150 किलोमीटर, 350 किलोमीटर आणि 600 किलोमीटर इतकी आहे.

 

Comments are closed

error: Content is protected !!