रा.से.यो. विभाग प्रादेशिक संचालनालय महाराष्ट्र व गोवा, रा.से.यो. विभाग महाराष्ट्र राज्य, रा.से.यो. विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, रा.से.यो. विभाग बाबुरावजी घोलप महाविद्यालय, सांगवी यांच्या संयुक्त विद्यमाने या राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन होत आहे.
कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावा नंतरची देशभरातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यप्रणाली व आयोजित होणारी विशेष शिबिरे याबद्दल डाॅ. एस. डी. कार्तिगन (संचालक,रा.से.यो. विभाग प्रादेशिक संचालनालय, महाराष्ट्र व गोवा), डाॅ. अतुल साळुंके (स्टेट लायसन आॅफिसर,रा.से.यो. विभाग महाराष्ट्र राज्य), डाॅ. प्रभाकर देसाई (समन्वयक, रा.से.यो. विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे), डाॅ. नितीन घोरपडे (प्राचार्य, बाबुरावजी घोलप महाविद्यालय, सांगवी) यांच्या मार्गदर्शन व नियोजनाखाली आयोजित सदर वेबिनार मध्ये डाॅ. कमल कुमार कर (सहाय्यक कार्यक्रम उपदेशक, नवी दिल्ली), डाॅ. सॅम्युअल चेल्लाइ (संचालक,रा.से.यो. विभाग प्रादेशिक संचालनालय, चेन्नई), डाॅ. एन. बी. खुंटिया (संचालक,रा.से.यो. विभाग प्रादेशिक संचालनालय, भुवनेश्वर), डाॅ. सी. एम. सिल्वत (गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद), डाॅ. संजय चाकणे (सदस्य, व्यवस्थापन परिषद, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) डाॅ. सुनिल शिंदे (युथ आॅफिसर, रा.से.यो. पुणे), अपर्णा देशपांडे (युनिसेफ) आदि देशभरातील नामांकित तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. नितीन करमळकर व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अॅड. संदीप कदम यांची यावेळी विशेष उपस्थिती असणार आहे.
सदर राष्ट्रीय वेबिनार साठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अजितदादा पवार, उपाध्यक्ष राजेंद्रजी घाडगे, मानद सचिव अॅड. संदीप कदम, खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव (प्रशासन) ए. एम. जाधव यांनी सदिच्छा दिल्या आहेत.
आतापर्यंत देशभरामधुन १००० पेक्षा जास्त लोकांनी या राष्ट्रीय वेबिनार साठी नोंदणी केली असून, महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठाशी संलग्नित राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम समन्वयक, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महाविद्यालय कार्यक्रम अधिकारी यांनी मोठ्या संख्येने या वेबिनार मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य डाॅ. नितीन घोरपडे व वेबिनार समन्वयक प्रा. अमृता इनामदार यांनी केले आहे.
Comments are closed