उत्तर प्रदेश, दि.२५ ( punetoday9news):- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महिलांविरोधात होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.
रस्त्यावर मुलींची छेड काढणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी, तसेच या व्यक्तींचे फोटो शहरातील चौकांमध्ये लावण्यात यावेत, असे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.
त्यानुसार
▪️ महिलांविरोधातील गुन्ह्यातील आरोपींना महिला पोलिसांच्या हस्तेच दंड आणि शिक्षा करावी.
▪️ छेडछाड करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी महिला पोलिसांना नियुक्त करण्यात यावे.
▪️ या आरोपींना मदत करणाऱ्यांनाही सोडू नये, या लोकांची नावंही सर्वांसमोर उघड करण्यात यावीत.
योगी सरकारने दिलेल्या या आदेशावर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया येत असून अनेकांनी या आदेशाचे कौतुकदेखील केले आहे.
Comments are closed