चेन्नई, दि.25( punetoday9news):- प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन झाले आहे. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर चेन्नईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु होते.
▪️ 5 ऑगस्ट रोजी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना एमजीएम हेल्थकेअर या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते
▪️ त्यानंतर योग्य उपचार घेतल्यामुळे त्यांनी कोरोनावर मात केली होती. याविषयी त्यांच्या मुलाने एसपी चरण यांनी माहिती दिली होती.
▪️ मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली म्हणून त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते.
एस. पी. बालसुब्रमण्यम यांना आवाजाचा जादूगार म्हटले जायचे. त्यांनी जवळपास 40 हजार गाण्यांना आपला आवाज दिला आहे.
Comments are closed