दिल्ली, दि 25 ( punetoday9news):- देशात इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने केंद्र सरकारने विविध राज्यांसाठी 670 बसेस मंजूर केल्या आहेत.

मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले कि,

‘फेम इंडिया’च्या दुसर्‍या टप्प्यात मोदी सरकारने महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि चंदीगडसाठी 670 नवीन इलेक्ट्रिक बसेस मंजूर केल्या आहेत.

इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी चार्जिंग स्टेशन तयार करणे फार महत्वाचे आहे. मध्य प्रदेश, तामिळनाडू, केरळ, गुजरात आणि पोर्ट ब्लेअर मध्ये 241 चार्जिंग स्टेशनला देखील मंजुरी दिली आहे.

मोदी सरकारने मंजूर केलेल्या 670 बसेसमध्ये महाराष्ट्रासाठी 240 बसेस, गुजरातसाठी 250 बसेस चंदीगडसाठी 80 बसेस आणि गोव्यासाठी 100 बसेस देण्याचा निर्णय घेण्यात आहे.

येत्या काळात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने धावतील असं मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले.

 

Comments are closed

error: Content is protected !!