सांगवी:- सांगवी, पिंपळे गुरव परिसरात सातत्याने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत सामाजिक कार्य करणारी संस्था सांगवी परिसर महेश मंडळाने  दरवर्षीप्रमाणे समाजउत्पत्ती दिनानिमित्त  कै.तुकाबाई जगन्नाथ लोहिया व यांच्या स्मरणार्थ २० व्या रक्तदान  शिबिराचे आयोजन करण्यात आले. राज्यातील रक्ताचा तुटवडा भागवण्यासाठी कोविड १९ च्या सर्व नियमांचे पालन करीत पिंपळे गुरव येथील निळू फुले  नाट्यगृहातील बहुउद्देशीय हॉल  मध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .
तत्पूर्वी सांगवी येथील माहेश्वरी चौकातील भगवान शंकराच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी 
 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका शारदाताई सोनवणे यांनी स्वतः रक्तदान केले.  यावेळी नगरसेवक हर्षल ढोरे,  पुणे जिल्हा माहेश्वरी प्रगती मंडळाचे अध्यक्ष गोविंदजी मुंदडा , सतीश लोहिया, पंकज चांडक  आदी उपस्थित होते.
रक्तदान शिबिरात १४१ रक्तदात्यानी रक्तदानाचे पवित्र  कार्य  केले. रक्तसंकलनसाठी के इ एम हॉस्पिटलच्या रक्तपेढ़ीने सहकार्य केले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी निलेश अटल , दीपेश मालानी , भूषण हरकुट, पंकज टावरी , गणेश , तुषार माहेश्वरी ,विवेक झंवर   यांनी सहकार्य केले.
बातमी साठी संपर्क:-
Punetoday9news
पत्रकार- सागर झगडे.
punetoday9news@gmail.com
9922557929

#

Comments are closed

error: Content is protected !!