पिंपरी चिंचवड मधील ॠतुराज गायकवाडनेही केली पुन्हा पुणेकरांची निराशा.
पृथ्वी शाॅच्या अर्धशतकाने वेधले लक्ष.
IPL, दि. 26(Punetoday9news):- चेन्नई सुपर किंग चा13 व्या मोसमातील सलग दुसरा पराभव झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सने चेन्नईवर 44 धावांनी मात केली आहे. दिल्लीने चेन्नईला विजयासाठी 176 धावांचे आव्हान दिले होते. मात्र चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 131 धावाच करता आल्या. चेन्नईकडून फॅफ डु प्लेसिसने सर्वाधिक 43 धावा केल्या. दिल्लीकडून खगिसो रबाडाने 3 विकेट्स घेतल्या.
दिल्लीने दिलेल्या विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या चेन्नईने सावध सुरुवात केली. सलामीवीर मुरली विजय आणि शेन वॉटसनने सावध सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी या दोघांनी 23 धावा जोडल्या. यानंतर शेन वॉटसन 14 धावा करुन बाद झाला. यानंतर मैदानात फॅफ डुप्लेसि आला. यानंतर चेन्नईची सहाव्या ओव्हरमध्ये दुसरी विकेट गेली. मुरली विजय 10 धावा करुन तंबूत परतला. नवख्या ऋतुराजने आजही निराशा केली. ऋतुराज 5 धावांवर रनआऊट झाला.
धोनी कडूनही चाहत्यांची निराशा झाली. सलग दूसरा पराभवातून चेन्नई सुपर किंग टीम पुन्हा उभारी घेईल का? हे पाहणे क्रिकेट प्रेमींसाठी औत्सुक्याचे ठरेल.
Comments are closed