मुंबई, दि. २६ ( punetoday9news):- विविध क्षेत्रात आपल्या नेतृत्व गुणांचा अमिट ठसा उमटविणाऱ्या महिलांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते शुक्रवारी राजभवन येथे ‘प्रेरणादायी नेतृत्व‘ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका आशा खाडिलकर, न्यायवैद्यक शास्त्रज्ञ डॉ. वसुधा आपटे, विमानचालन क्षेत्रातील उद्योजिका लिना जुवेकर – दत्तगुप्ता, डॉ. उज्वला जाधव व बेलिन्डा परेरा (समाजकार्य) व दूरदर्शनच्या वृत्तनिवेदिका शिबानी जोशी यांना यावेळी प्रशस्तीपत्र व भगवद्गीतेची प्रत देऊन सन्मानित करण्यात आले. प्रिया सावंत यांच्या लीडिंग लेडी फाउंडेशनच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
मातृशक्तीचा सन्मान करणे हे आपले सौभाग्य असल्याचे सांगून महाराष्ट्रात महिला विविध क्षेत्रात नेतृत्व प्रदान करीत आहेत ही अभिमानाची गोष्ट असल्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले.
हिन्दी आणि इंग्रजी वृत्तपत्रांपेक्षा मराठी वृत्तपत्रांमध्ये महिला स्तंभलेखिका मोठ्या प्रमाणात लिखाण करीत असल्याचे निरीक्षण त्यांनी यावेळी नोंदविले.
Comments are closed