पुणे, दि. २६( punetoday9news):- जुगार अड्यावर छापा टाकून दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.२२) सुखसागरनगर, कोंढवा या ठिकाणी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या वतीने करण्यात आली.
जुगार घेणा-या राम भुजंग साठे (वय ३६, रा. अपर सुपर पुणे) दादासाहेब विनायक नरसाळे (वय ३४, रा.अपर इंदिरानगर सुखसागरनगर, पुणे) व जुगार खेळणाऱ्या ८ जणांना ताब्यात घेतले आहे. जुगार खेळणाऱ्या व जुगार घेणा-या १० जणांविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस उप. निरीक्षक श्रीधर खडके यांना कोंढवा बु. येथील साईनगर, सुखसागरनगर, येथे निलेश तुपे व त्याचे साथीदार तेरा पत्ती रम्मी जुगार घेत असल्याची गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार याठिकाणी अचानक छापा टाकून जुगार घेणारे दोघेजण आणि खेळणारे आठ जणांना ताब्यात घेतले.
कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, पोलीस उप.आयुक्त गुन्हे संभाजी कदम, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे शिवाजी पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे व पोलीस उप निरीक्षक श्रीधर खडके यांच्यासह सामाजिक सुरक्षा विभागाकडील, पोलीस नाईक आण्णा माने, पोलीस नाईक हनुमंत कांबळे, पोलीस नाईक इरफान पठाण, पो.को. संतोष भांडवलकर, पोलीस काॅन्सटेबल संदीप कोळगे, पोलीस शिपाई शशांक खाडे यांनी ही कारवाई केली.
Comments are closed