मुंबई , दि. २६ (punetoday9news) :- महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत . शिवसेना खासदार संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये झाल्याचे बोलण्यात येत आहे. या संदर्भात एका वृत्तवाहिनीने माहिती समोर आणले आणली आहे . आज दुपारी दीड ते साडेतीन असे तब्बल दोन तास ही भेट झाल्याचे बोलले जात आहे .
भेट झाली असली तरी संजय राऊत यांनी मात्र या भेटीस दुजोरा दिला नाही . मात्र देवेंद्र फडणवीसांची पांढऱ्या रंगाची गाडी या हॉटेलमधून बाहेर पडताना दिसते दुपारी दीड ते साडेतीन पर्यंत चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे . या भेटीच्या चर्चेचा तपशील गुलदस्त्यात आहे.
सांताक्रूज येथील सप्ततारांकीत हॉटेल ग्रॅड हयात येथे संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. सध्याच्या राजकीय घडामोडींवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असून या भेटीमागील मुख्य कारण अद्याप समोर आलेले नाही.
Comments are closed