पिंपरी,दि.२६(punetoday9news) :- पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या एका वक्तव्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. ते म्हणाले कि , “शहर सुरक्षित राखण्यासाठीच्या कामात नागरिकांनाही सहभागी करून घेतलं जाईल. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनासुद्धा बंदुकीचे परवाने देण्यात येतील,” .
मात्र आधीच वाढती गुन्हेगारी व त्यात सर्व सामान्य नागरिकांना ही परवाना देण्याची तयारी, त्यामुळे वाढती गुन्हेगारी कमी होण्या ऐवजी वाढण्याचीच भीती व्यक्त होत आहे . सामान्य नागरिक हे सुरक्षेसाठी सर्वस्वी पोलिसांवर अवलंबून असतात त्यांना रोजची भाकरी मिळवणे, कुटूंबाच्या गरजा पूर्ण करून तंटामुक्त आनंदी जीवन जगणे हे महत्वाचे असते . स्वतःच्या स्वरक्षणासाठी बंदूक घेऊन फिरणे हि संकल्पनाच सामान्य नागरिकांच्या पचनी पडणारी नाही. शहरात वाढती गुन्हेगारीमुळे रोज नवीन गुन्हे घडल्याची माहिती मिळते . त्यात या सर्व सामान्यांना सुरक्षा मिळण्या ऐवजी बंदूक मिळणार म्हटल्यावर मोठा प्रश्नच निर्माण झाला आहे . महाराष्ट्रातील परिस्थिती इतर राज्यापेक्षा नक्कीच वेगळी आहे इथे नागरिक गुन्हेगारी वृत्ती पेक्षा शांततेला जास्त प्राधान्य देत असतात . अगदी छोटे मोठे व्यावसायिक सुद्धा भांडण तंट्यापासून अलिप्त राहण्यास प्राधान्य देतात . काही ठिकाणी छोट्या मोठ्या मारामाऱ्या झाल्या तरी त्या पोलीस स्टेशन पर्यंत जाण्या अगोदर सुटत असतात . काही अपवादात्मक गुन्हेगारी वृत्तीचे गुन्हे दाखल असलेले व काही ठिकाणी गुन्हे दाखल नसलेले गुन्हेगार आहेत त्यावर पोलीस प्रशाशनाकडून अंकुश ठेवण्याची गरज आहे .
मात्र प्रत्येक नागरिकांना बंदूक परवाना मिळू लागल्यास छोट्या मोठ्या भांडणांतही लाठ्या काठ्या ऐवजी बंदुकी दाखवण्याचे प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रागाच्या भरात घरगुती कलह , जमीन , संपत्तीचे वाद होत असतात यात सोबत बंदूक असल्याने साहजिकच गंभीर परिणाम होऊ शकतात .
गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीस परवाना मिळणार नाही, असे पोलीस आयुक्तांकडून सांगण्यात आले असले तरी कित्येक गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्ती शहरात आहेत .ज्यांनी कित्येक छोटे मोठे गुन्हे केले असून भीतीपोटी यांच्या विरुद्ध नागरिकांनी तक्रार केलेली नसते त्यामुळे कायद्याने ती व्यक्ती गुन्हेगार नसून बंदुकीचा परवाना धारण करण्यास पात्र ठरू शकते . अशा प्रकरणात काय होणार असाही प्रश्न उपस्थित होतो. गुन्हेगारी वर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरात यापूर्वी नागरिकांचा सहभाग हा पोलीस मित्र संघटनेच्या माध्यमातून होताच त्यामुळे नागरिकांचा बंदूक घेऊन सहभाग गुन्हे कमी करण्यासाठी होणार कि गुन्हे वाढवण्यासाठी ? असा हि प्रश्न सामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे.
तसेच हा निर्णय घेताना समाजाच्या सर्व स्तरातून व्हायला हवा पाहिजे असे मत सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.
Comments are closed