दिल्ली, दि.२७ (punetoday9news):- विविध मिठाईच्या दुकानांमध्ये ट्रेमध्ये विनापॅकिंग ठेवण्यात येणारी खुली मिठाई, दुधापासून बनविलेले पदार्थ यांच्या ट्रेसमोर त्या पदार्थाची एक्सपायरी डेट (मुदतीची तारीख) टाकण्याचे केंद्र सरकारच्या अन्न व पुरवठा विभागाने बंधनकारक केले आहे.
या निर्णयामुळे आता ग्राहकांना बाजारात विकल्या जाणाऱ्या खुल्या मिठाईची मुदत समजू शकणार आहे. सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने यासाठी पावले उचलली आहेत.
सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने आदेशात म्हटले आहे कि, दुकानात विकण्यासाठी ठेवलेल्या मिठाईच्या ट्रेवर १ ऑक्टोबर २०२० पासून, उत्पादनाच्या ‘बेस्ट बिफोर डेट’चा उल्लेख करावा.
व्यापाऱ्यांना १ ऑक्टोबरपासून सर्व खुल्या मिठाईवर त्या किती दिवसांपर्यंत खाऊ शकतो, तसेच दुकानदार ती मिठाई तयार केलेली तारीखही लिहू शकतात.
घरात वापरल्या जाणार्या मोहरीच्या तेलात इतर कोणत्याही खाद्यतेलाची भेसळ करण्यास १ ऑक्टोबरपासून पूर्णपणे बंदी घातली आहे.
“मिठाई दुकानांमध्ये मिठाई किंवा इतर अन्न पदार्थांची उघड्यावर विक्री होते. त्यांना आता या पदार्थांच्या ट्रेसमोर एक्सपायरी डेट लिहिणे बंधनकारक असेल. हा चांगला निर्णय असून राज्यात त्याची कडक अंमलबजावणी केली जाईल”, असे अन्न-औषध विभागाचे आयुक्त अरुण उन्हाळे म्हणाले.
Comments are closed