व्हॉट्सॲपवरील तुमचे वैयक्तिक मेसेज कसे वाचले जाऊ शकतात? 

इतर कलाकारांचे धाबे दणाणले. 

मुंबई, दि. २७.( punetoday9news):- सुशांतसिंह प्रकरणात दररोज बऱ्याच सेलिब्रेटींचे व्हॉट्सॲप चॅट समोर येत आहे. यामुळे व्हॉट्सॲप युजर्सला व्हॉट्सॲपबद्दल असुरक्षितता वाटत असल्याचे दिसत आहे.

व्हॉट्सॲपवर अकाऊंट उघडताना यूजर्सला फक्त मोबाईल नंबरची गरज असते आणि आलेल्या मेसेजद्वारेच अकाउंट व्हेरिफाय केले जाते.

व्हॉट्सॲप दुसऱ्या सोशल मिडिया सर्विसेससारखे कोणताही पिन अथवा पासवर्ड सेट करण्याचा ऑप्शन देत नाही, ज्याद्वारे अकाऊंटमध्ये लॉग इन केले जाऊ नये.

मात्र यावरून एक समजते की, एखाद्या यूजर्सचा नंबर क्लोन केला तर त्याचे अकाऊंटमध्ये लॉग इन केलं जाऊन जुना चॅट बॅकअपही घेता येऊ शकतो.

व्हॉट्सॲपचा टू फॅक्टर ऑथींटीकेशनही अशात काम करु शकत नाही. कारण यासाठी लागणारा ६ अंकी कोडही यूजर्सच्या फोन नंबरवर येत असतो.

त्यामुळे व्हॉट्सॲप वापरताना सर्व सुरक्षा मोड ऑन ठेवली पाहिजेत. फिंगरप्रिंट आणि इतर ॲपलॉक नेहमी ऑन ठेवली पाहिजेत.

व्हॉट्सॲप त्यांच्या सुरक्षेवर म्हणाले आहे की, व्हॉट्सॲपवर एंड टू एंड एनक्रिप्टेड चॅटींग करता येत असल्याने कोणत्याही थर्ड पार्टीला हे वाचता येऊ शकत नाही. एंड टू एंड एनक्रिप्टेड म्हणजे ज्यावेळेस एखादा मेसेज सेंडरकडून रिसिव्हरला पाठविला जातो त्यावेळेस तो एका कोडमध्ये जात असतो. मध्ये कोणीच मेसेजेस अथवा झालेली चॅटींग पाहू शकत नाही. अगदी व्हॉट्सॲपलाही हे मेसेज वाचता येत नाहीत.

सुशांतसिंह प्रकरणाच्या चौकशी दरम्यान, जुन्या व्हॉट्सॲप चॅटचा आधार घेत एनसीबीने अनेक बड्या कलाकारांना समन्स बजावलेय. त्यामुळेच कंपनीला खुलासा करावा लागत आहे. ‘चौकशी अधिकाऱ्यांना कायदेशीर पद्धतीने जुना डेटा मिळवण्याची अनुमती आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांना फॉरेन्सिक पद्धतीने या डेटापर्यंत पोहचावे लागते’, असे व्हॉट्सॲपकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments are closed

error: Content is protected !!