पुणे, दि २७ ( punetoday9news):- पुणे शहरातील कोविड रुग्णांसाठी बांधलेल्या जम्बो रूग्णालयातून आता नवीन तक्रार समोर आली आहे. त्यानुसार एका महिला डाॅक्टरने सहकर्मचारी दोन पुरूष डाॅक्टरांवर विनयभंगाची तक्रार शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.
जम्बो रूग्णालय हे पत्रकार रायकर मृत्यू प्रकरण, महिला हरवल्याचे प्रकरण यामुळे चर्चेत असताना हा प्रकार समोर आल्याने या रुग्णालयातील कामकाजाबाबत सर्व सामान्यांकडून प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी डाॅक्टर व तक्रारदार महिला डाॅक्टर यांच्यात अगोदरचे वाद असल्याचे बोलले जात आहे.
सदर वाद हे डाॅक्टरांमधील असले तरी त्यामुळे तेथे भरती असलेल्या रूग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. तेथे निर्माण होणाऱ्या या नवनवीन गैरप्रकारामुळे रूग्णालयाच्या व्यवस्थापनाविरुध्द प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. या बाबत अधिक तपास पोलिस करत आहेत.
Comments are closed