पुणे, दि. २७ (punetoday9news):- खासगी प्रवासी कंपनी  ओला च्या प्रवाशांना विनाकारण भुर्दंड लावून प्रवेशांच्या खिशाला कात्री लावण्याचे काम कंपनी करत असल्याचा आरोप प्रवासी करत आहेत.

सध्या कोरोना प्रादुर्भावाने सुरक्षेच्या कारणास्तव नागरिक खासगी प्रवासी वाहनाने प्रवास करत आहेत मात्र याच संधीचा गैरफायदा ओला कंपनी घेत असल्याचा आरोप प्रवासी करत आहेत. सध्या खासगी प्रवासी वाहनाचे ऑनलाईन बुकींग करताना त्या परिसरात वाहन उपलब्ध नसल्याचे ॲप्लिकेशनमध्ये दिसते व ग्राहक प्रवाश्याने कसलेही बुकींग रद्द न करता त्याने बुकींग रद्द केल्याचा मेसेज प्राप्त होतो त्यापुढे ते बुकींग रद्द केल्याचा भुर्दंड म्हणुन कंपनी प्रवाश्याच्या खात्यातून पैसे कापते.  एखाद्याने त्यावेळी पैसे देण्यास नकार दिला तरी कंपनी त्यापुढे शक्कल लढवून पुढील बुकींग मध्ये पुर्वीचा दंड जमा करून भाडे वसूल करते.
झालेल्या गैरसोयीची व आकारलेल्या वाढीव भाड्याची तक्रार करण्यासाठी फक्त ईमेल हा पर्याय निवडण्याचा पर्याय उपलब्ध होतो व तेवढा वेळ कामाच्या घाईत असलेल्या प्रवाशाकडे नसतो. तसेच कंपनीकडे सद्यस्थितीत  पुणे व पिंपरी चिंचवड शहरासाठी फोन द्वारे समस्या निराकरण करण्यासाठी कस्टमर काॅल सेंटरची सुविधा उपलब्ध नाही ही बाब भयंकर धोकादायक म्हणावी लागेल.  कारण रात्री अपरात्री होणाऱ्या बाबींसाठी प्रवासी ईमेल वर तक्रार करून प्रतिसाद येण्याची वाट पाहत बसणार का? असा संतप्त प्रश्न प्रवासी करत आहेत.  तसेच या प्रकारे वारंवार होत असलेल्या फसवणूकीची दखल वाहतूक विभागाने घेवून अशा प्रकारे प्रवाश्यांच्या  खिशाला कात्री लावणाऱ्या ओला कंपनीवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Comments are closed

error: Content is protected !!