नाशिक, दि. २७ ( punetoday9news):- नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी अतिवृष्टी नुकसान पाहणी दौरा केला.
यावेळी अनेक नुकसान ग्रस्त शेतांना त्यांनी भेट दिली. संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सततच्या संकटांनी शेतकरी त्रस्त झालेत त्यामुळे आता प्रत्येक शेतात पंचनाम्यात वेळ न घालवता सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई तात्काळ शेतकऱ्यांना द्यावी . अन्यथा सातत्याने होणाऱ्या नुकसानीने आत्महत्या वाढल्यास त्याचे पाप केंद्र व राज्य दोन्ही सरकारच्या माथ्यावर राहील असे यावेळी प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
यावेळी त्यांच्या सोबत नाशिक पक्ष जिल्हाध्यक्ष राजू शिरसाठ, युवा जिल्हाध्यक्ष परशराम शिंदे , कार्याध्यक्ष सुभाष आहिरे ,तालुका अध्यक्ष निलेश चव्हाण ,सचिन कड, यांच्या सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
Comments are closed