IPL ,दि.२८(punetoday9news):- वीस षटकांच्या सामन्यात तब्बल २२४ धावा पाठलाग करून राजस्थान राॅयल्स ने रोमहर्षक विजय प्राप्त केला. शेवटच्या षटकांपर्यंत गेलेल्या अटीतटीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबचा ४ गडी राखून पराभव केला आहे. राहुल तेवतिया राजस्थानच्या विजयाचा हिरो ठरला आहे. तेवतियाने अवघ्या ३१ चेंडूमध्ये ७ षटकारांच्या मदतीने तुफानी ५३ धावा केल्या.
पंजाब कडून खेळताना मयंक अग्रवाल विस्फोटक खेळी करत ४५ चेंडूत १०६ धावा केल्या तर लोकेश राहूलने ही ६९ धावांची खेळी करत पंजाब ला २२३ धावांवर नेवून ठेेवले .
याचा पाठलाग करताना राजस्थान राॅयल्स कडून संजू सॅमसन व स्टीव्हन स्मिथ यांनी तूफानी खेळी करत धावांचा पाऊस पाडला. प्रत्येक गोलंदाजांना लक्ष करत षटकारांची बरसात पहायला मिळाल्याने घरून क्रिकेटचा सामना पहावा लागल्याची खंत क्रिकेट प्रेमींच्या मनात आली असावी.
राहुल तेवतियाने शेल्डन कॉट्रेलच्या १८ व्या षटकात तब्बल ५ षटकार लावले. तेवतियाच्या या खेळीनंतर सामना राजस्थानच्या बाजूने झुकला. मात्र यानंतर राहुल ५३ धावांवर बाद झाला. राहुलने आपल्या खेळीत ७ षटकार लगावले. यानंतर रियान पराग भोपळा न फोडता बाद झाला. मात्र जोफ्रा आर्चरने २ चेंडूवर २ षटकार ठोकले.व राजस्थानने ३ चेंडू राखून ४ गडी राखून पंजाबवर रोमांचक विजय मिळवला.
Comments are closed