नाशिक, दि. २८ ( punetoday9news):-  जागतिक पर्यटन दिनानिमित्त आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गंगापूर धरण परिसरातील (जि. नाशिक) ‘एमटीडीसी ग्रेप पार्क रिसॉर्ट’ आणि बोट क्लबचे तसेच खारघर (नवी मुंबई) येथील ‘एमटीडीसी रेसीडेन्सी’ या पर्यटक संकुलाचे ई-उद्घाटन करण्यात आले.

मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करताना ‘रायगड किल्ला केंद्राकडून राज्याच्या ताब्यात घेऊन शिवरायांच्या काळात हा किल्ला जसा होता तसा तो पुन्हा बनविण्याची’ संकल्पना मांडली.

तसेच नाशिक हे देशातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. पर्यटक आल्यानंतर तो फक्त देवदर्शन करुन परत न जाता त्याने काही दिवस येथे राहावे यासाठी शिर्डी, त्र्यंबकेश्वर, सप्तश्रुंगी गड आदी  जवळील पर्यटनस्थळांची कनेक्टिव्हीटी वाढविण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले कि, “राज्यातील फक्त पर्यटनस्थळांशिवाय तिथे जायचे कसे, रहायचे कुठे, रेल्वे स्थानके, विमानतळ, त्या पर्यटनस्थळास भेट देण्याचा योग्य काळ इ. माहिती, सोयी-सुविधा आपल्याला पर्यटकांसाठी उपलब्ध कराव्या लागतील. आमच्या शासनाने रायगडच्या विकासासाठी 600 कोटी रुपयांचा निधी दिला. गुंफा, गडकिल्ले, वन्यप्राणी, वाघ, समुद्रकिनारे, जंगले हे वैभव जगापर्यंत पोहोचवून महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवू”, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Comments are closed

error: Content is protected !!