माणूस सुखासाठी आयुष्यात फक्त धावाधाव करतो. सुख या शब्दाची कल्पना प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार करून घेतलेली असते. आयुष्याच्या प्रवासात उंच पाहण्याच्या व वर वर जाण्याच्या धुंदीत स्वतःला हरवून बसतो. व स्वतः च्या पायांना हवेत नेवून जमीन गमावून बसतो आणि मग सुखासाठी व कदाचित देखाव्यासाठी चार दिवस सुट्टीवर कुठेतरी जाऊन आनंद, सुख शोधण्याचा विचार करू लागतो.
पण खरंच आयुष्यात सुख म्हणजे नक्की काय असतं असा विचार केला तर प्रशांत दामले यांच्या म्हणण्यानुसार- पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. हो पण या साठी काय वेगळं करायला हव तर सर्वात प्रथम अंतःकरणातूण मीपणा व पैशाची श्रीमंतीचे ढोंग काढून टाकणे गरजेचे आहे. कारण
यातही वर्गवारी असते ? कुणाकडे दोनच फ्लॅट आहेत म्हणून तो दुःखी तर कुणाच्या पाचमजली इमारतीच्या चार मजल्याच्या पूर्ण बांधकामानंतर पाचव्या मजल्याचे काम लगेच पुर्ण होणार नाही म्हणून दुःखी..? त्यामुळे दुःख ही पैसे वाल्यांना नसतात अस नाही तर त्यांच्याकडे जीवनातील प्रत्येक प्रसंगात सकारात्मक विचार करण्याच्या कमीने वाढत असतात….. आज तर एका मित्राने फोन केला सर्व गप्पा मारून झाल्यावर स्वतः चे दुःख व्यक्त केले म्हणे लाॅकडाऊनने दरवर्षीच्या पाच लाखाच्या नफ्याऐवजी फक्त पावनेचारच लाख नफा होणार. ?? विपरीत परिस्थितीतही एवढा नफा मिळाल्यावर आनंदाने स्वीकार करायला हवा होता. मात्र माणसाला पैशाची भूक ही सुखापेक्षा जास्त आहे हे वर्तमान काळातील सत्य आहे.
आज लाॅकडाऊन काळात सर्वांना उद्या काय होईल याची चिंता असताना महाराष्ट्रातील गृहिणींना पापड, कुरडई बनवण्याची चिंता होती. हा विनोदाचा भाग सोडला तर त्यातही भारतीय स्रीया जीवनविषयी किती सकारात्मक आहेत हे जाणवते. मी उद्याही असेल माझ्या कुटुंबाला काहीही होणार नाही असा आत्मविश्वास त्यातून व्यक्त होतो.
आपल्या सांगवी परिसरातील एका जेष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्राच्या बाकावर लाॅकडाऊन च्या काळात दृश्य पाहायला मिळाले. गावाकडे साडीची झोळी करून आई मुलांना झोपवते तर काही ठिकाणी त्याच साडीने लहान मुले झोका बनवतात. तसा झोका या ठिकाणी बांधून झोपडीतील बालगोपाळांनी जीवनातील आनंदाचा क्षण शोधला असल्याचे चित्र पहायला मिळाले.
झोपडीत तप्त उन्हाचा पारा बसून देत नाही ना फॅन, ना कार्टून पहायला टिव्ही, ना कुलर, ना एसी मात्र हा झोका बनुन गेला या सर्वांवर भारी…..
आनंद शोधण्याचा प्रवासात स्वतः हरवण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीला आनंदात परावर्तित करण्यात खरा आनंद आणि खरे सुख आहे असेही त्या मुलांचा झोका सांगुन जातोय. हा लाॅकडाऊनचा काळ हा आहे आत्मचिंतणाचा व आनंदाचा क्षण शोधत बसण्यापेक्षा आपल्या स्वतः च्या वर्तनाने आनंदीत राहण्याचा व इतरांना आनंदीत करण्याचा..
– सागर झगडे. ??
Comments are closed