मुंबई, दि. २८ ( punetoday9news):- एनसीबीने सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्स कनेक्शनमध्ये मागील आठवड्यात अटक करण्यात आलेल्या निर्माता क्षितीज प्रसादने एजेंसीवर गंभीर आरोप केले आहेत.
प्रसादचे वकील सतीश मानशिंद यांनी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले की, एजेंसीच्या अधिकाऱ्यांनी निर्मात्याला त्रास दिला व ब्लॅकमेल केले.
मानशिंदे यांनी सांगितले की, क्षितीज प्रसादला चौकशी दरम्यान करण जोहर आणि त्यांच्या टॉप एग्झिक्यूटिव्हसला अडकवण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. एनसीबीच्या अधिकारी म्हणाले की जर करण जौहर, सोमेल मिश्रा, राखी, अपुर्वा, नीरज आणि राहिल यांचे नाव घेतल्यास सोडून दिले जाईल.
मागील आठवड्यात एनसीबीने प्रसादला अटक केले आहे. त्याच्याद्वारे वकीलांनी सांगितले की, अधिकाऱ्यांनी मला खोटे आरोप लावण्यास सांगितले की ते ड्रग्स घेतात. माझ्यावर दबाव टाकल्यानंतर देखील मी त्यांचे ऐकले नाही. कारण, मी त्यांना वैयक्तिकरित्या ओळखत नाही व मला त्यांच्यावर खोटे आरोप लावायचे नाहीत.
मानशिंदे म्हणाले की, वानखेडेने यांनी क्षितीजला आपल्या खुर्चीजवळ जमिनीवर बसण्यास सांगितले व त्याच्या चेहऱ्यासमोर बूट ठेवून तुझी खरी लायकी ही आहे, असे म्हटले. यावेळी इतर अधिकारी हसत होते.
याबाबत करण जोहरने क्षितीज प्रसादचा धर्मा प्रोडक्शन्सशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे.
Comments are closed