पिंपरी,दि.२९( punetoday9news):- कोरोना संकटकाळात सामान्य जनता कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे व आरोग्य व्यवस्थेवरील ताण यामुळे चिंतित असतानाच सामान्य जनतेला दिलासा देणारी एक सकारात्मक बातमी म्हणुन भोसरी येथील ८५ वर्षांच्या आजी इंदुबाई दिवटे यांच्या उदाहरणातून पाहता येईल.
भोसरी येथे राहणारे लायन्स क्लब ऑफ पुणे रहाटणीचे सदस्य लायन महेश दिवटे यांच्या ८५ वर्षांच्या आजी इंदुबाई दिवटे यांनी नुकतीच कोरोना वर यशस्वीपणे मात केली आहे. एकत्र कुटुंब पद्धतीत राहत असलेल्या इंदुबाई दिवटे या आजींच्या घरातील जवळपास सर्वच जण कोरोना पॉझिटिव आले होते. परंतु सकारात्मक विचार, योग्य औषधोपचार व सकस आहार या बळावर आजींनी केवळ सहाच दिवसात कोरोना सारख्या गंभीर आजारावर मात केली. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली योग्य उपचार, आहार व विचार ठेवले तर या वयात देखील कोरोना आजारावर सहजपणे मात करता येते हाच संदेश या निमित्ताने आजींनी दिला आहे.
Comments are closed