दिल्ली, दि. २९ ( punetoday9news):- सध्या जगभरासह भारतातदेखील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून भारत सर्व ताकदिनिशी कोरोनाशी लढा देत आहे.
मात्र आता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने चीनमधील कॅट क्यू अर्थात CQV हा विषाणू भारतात केव्हाही दाखल होऊ शकतो, असा इशारा केंद्र सरकारला दिला आहे.
चीन तसेच व्हिएतनाममध्ये कॅट क्यू विषाणूचे अस्तित्व असून हा विषाणू प्रामुख्याने डासांमध्ये आणि डुकरांमध्ये आढळला आहे तसेच भारतातील क्यूलेक्स डासांमध्येदेखील या विष्णुसदृश्य आढळल्याचे अहवालात म्हटले आहे.
चीनमध्ये या विषाणूने स्थानिक स्थरावर प्रभाव पाडणे सुरु केले आहे. विषाणूसंदर्भात माहिती ICMR च्या पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या ७ संशोधकांच्या हवाल्याने दिली आहे.
मुलांमध्ये इन्सेफलाइटिसची समस्या, मनुष्याला तापाचा आजार मेनिन्जायटीस इत्यादी गोष्टींची बाधा या विषाणूमुळे होते, असेदेखील संबंधित अहवालात नमूद करण्यात आले आहे.
Comments are closed