मुंबई,दि.२९ ( punetoday9news):- देशावर तसेच विशेषतः महाराष्ट्रावर गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून कोरोनाचे सावट असल्यामुळे अनेक सण-उत्सव रद्द करण्यात येत आहेत तसेच काही सण-उत्सव साधेपणाने नियम पाळून साजरे करण्यात येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आगामी काळातील नवरात्रौत्सव, दुर्गापूजा आणि दसऱ्यासाठी राज्य सरकारच्या गृह विभागाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

नवरात्रौत्सवासाठी सार्वजनिक ठिकाणी मूर्तीची उंची ४ फुटांपेक्षा तर घरगुती उत्सवासाठी २ फुटांपेक्षा जास्त नसावी. तसेच देवीची मिरवणूकही काढता येणार नाही.

सोशल डिस्टन्सिंगचा नियम हा दर्शन रांगांमध्ये पाळावा लागणार असून मंडपामध्येदेखील सॅनिटाझयरचा वापर करणे अनिवार्य असणार आहे.

गर्दी न करता धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या असून गरबा, दांडिया अशा कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे.

नवरात्रीच्या शेवटी अर्थात दसऱ्याच्या मुहूर्तावर रावण दहनास परवानगी असून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत गर्दी न करता रावण दहनास परवानगी असेल.

सरकारच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेचा प्रचार जनतेच्या हितासाठी करावा, अशा सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.

Comments are closed

error: Content is protected !!