कोल्हापूर, दि. ३० ( punetoday9news):- सध्या सोशल मिडिया वर चर्चा आहे ती संभाजीराजेंच्या साध्या राहणीमानाची. रायगडावरून कोल्हापूर कडे जातानाचा संभाजी राजेंचा एक अनुभव सर्वत्र वायरल होत आहे. जाणून घेवूयात त्यांच्याच शब्दात..
“कार्यकर्त्याने आणून दिलेल्या कांदा आणि चटणी भाकरी च्या चवीची सर दुसऱ्या कोणत्याही पदार्थाला नाही. आज रायगड किल्ल्याच्या कामांची पाहणी करून खाली यायला दुपार उलटली होती. सकाळ पासून काहीच खाल्लं नव्हतं. रस्त्याच्या कडेला गाडी लावून जेवण करायला संध्याकाळ चे 4:30 वाजले होते. पोट भर जेवण करून, पुन्हा मुंबई ला महत्वाच्या बैठकी करीता निघालो आहे.
दिल्लीतून निघून, नाशिक मधील राज्यस्तरीय मराठा मराठा क्रांती मोर्चाची बैठक संपवून दुसऱ्या दिवशी रायगड ला आलो. गेल्या वीस पंचवीस दिवसांपासून कोल्हापूर ला राजवाड्यावर गेलो नाही. रायगड वरून कोल्हापूर ला निघालो होतो. अर्ध्या रस्त्यात असतानाच फोन आला की राजे आपण मुंबई ला जाणं अत्यंत महत्वाचे आहे. मला घरी जाणं सुद्धा महत्त्वाचं होतं. पण मी तो पर्याय टाळला आणि मुंबई ला जाण्यासाठी निघालो. समाजाच्या भवितव्याचा प्रश्न असल्याने मला जाणं भाग आहे. छत्रपती ना स्वतः पेक्षा समाज महत्वाचा असतो.”
Comments are closed