पुणे, दि. ३० ( punetoday9news):- पुणे परिमंडल अंतर्गत आतापर्यंत महावितरणच्या विविध कार्यालयातील कोरोना संसर्ग झालेल्या एकूण 249 पैकी 158 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर दुर्दैवाने 8 वीजयोद्धांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 83 जणांवर विविध रूग्णालयात उपचार सुरु आहे. तसेच सुमारे 150 अधिकारी, कर्मचारी कोरोनाच्या संसर्गजन्य लक्षणांमुळे घरी क्वॉरंटाईन आहेत. मात्र कोरोनाशी झुंज देणाऱ्या सहकाऱ्यांच्या ठिकाणी अन्य वीजयोद्ध्यांनी कर्तव्य बजावत महावितरणच्या ग्राहकसेवेवर मनुष्यबळाअभावी कोणताही परिणाम होऊ दिलेला नाही.
वीजग्राहकांनी देखील वाढता कोरोना प्रादुर्भाव पाहता गरजेचे असल्याच कार्यालयात यावे.
महावितरणच्या सर्व ग्राहकसेवा मोबाईल ॲप तसेच www.mahadiscom.in या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. तसेच वीजबिलांबाबत शंका असल्यास त्याची घरबसल्या पडताळणी किंवा तपशील हा https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवर उपलब्ध आहे. या सेवांचा घरबसल्या लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले असल्याची माहिती महावितरण चे जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत यांनी दिली आहे.
Comments are closed