बीड, दि. १ ( punetoday9news):- मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने बीडमध्ये केतूरा गावात १८ वर्षीय विवेक रहाडे या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत तरुणाने याचा उल्लेख केला आहे.
‘विवेक’ने चिठ्ठीत काय लिहिलं..?
“मी विवेक कल्याण रहाडे एक कष्टकरी आणि गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला जीवनात खूप मोठं होण्याची इच्छा आहे. मी आत्ताच ‘नीट’ (NEET) परीक्षा दिली आहे. मराठा आरक्षण नसल्याने माझा नंबर लागत नाही. माझ्या घरच्यांची मला प्रायव्हेटमध्ये शिकवण्याची ऐपत नाही. त्यामुळे मी माझं आयुष्य संपवत आहे. मी मेल्यानंतर तरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना मराठ्यांच्या मुलांची कीव येईल आणि माझे मरण सार्थक होईल”, असे विवेकने चिट्ठीत लिहिले.
“मी एक कष्टकरी आणि गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला जीवनात खूप मोठे होण्याची इच्छा आहे. मराठा आरक्षण गेल्यामुळे माझा वैद्यकीयला नंबर लागणार नाही. खासगी महाविद्यालयांत वैद्यकीय शिक्षण घेण्याची माझी ऐपत नाही. त्यामुळे मी माझे आयुष्य संपवत आहे”, अशी चिठ्ठी विवेकने लिहिली आहे.
Comments are closed