गुजरात, दि. १( punetoday9news):- कोरोनाचे कारण पुढे करून कर्मचाऱ्यांकडून विनामोबदला ओव्हरटाईम करून घेणे गैर असल्याचे सुप्रीम कोर्टाने एका प्रकरणात निकाल देताना म्हटले आहे.
घटनात्मक तरतूदींना बाजूला सारत श्रमिकांच्या उचित मोबदल्याच्या अधिकार काढून घेण्याचे कारण कोरोनाची साथ ठरू शकत नाही.
राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारी आंतरिक आपत्कालीन परिस्थिती आहे असे कोरोना महासाथीबद्दल म्हणता येणार नाही.
उचित वेतन हे, रोजगाराचा अधिकार आणि जगण्याच्या अधिकाराचा एक भाग असून महासाथीसाठी श्रमिकांवर पूर्ण जबाबदारी टाकणे एक उपयुक्त प्रक्रिया नाही.
गुजरात सरकारने श्रमिकांबाबत एक आदेश जारी करत त्यांना ३ तास अतिरिक्त काम करण्यास सांगितले होते व त्याबदल्यात कोणताही अतिरिक्त मोबदला दिला नव्हता. मात्र सुप्रीम कोर्टाने यावर गुजरात सरकारला फटकारत एप्रिल महिन्यापासून कर्मचाऱ्यांना ओव्हरटाइमचा मोबदला द्यावा असे आदेश दिले आहेत.
या निर्णयाचे महाराष्ट्रातील कामगार स्वागत करत असून महाराष्ट्रात कित्येक खासगी क्षेत्रात कामकरणाऱ्या वर्गाला या निर्णयाने दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
Comments are closed