पिंपरी, दि. 2( punetoday9news):- आज 2 ऑक्टोबर, गांधीजयंती. संपूर्ण आयुष्य ज्यांनी शांततेसाठी वेचल अशा महात्मा गांधी यांचा जन्मदिवस! जगाला सत्य आणि अहिंसेची शिकवण देणाऱ्या या महापुरुषाला वंदन .
संपुर्ण जगाला अहिंसेची शिकवण देणारे महान पुरूष म्हणुन ओळखले जात असतानाही महात्मा गांधींना शिफारस होऊनही 5 वेळा ‘या’ कारणांमुळे नोबेल पुरस्कार मिळाला नाही.
1937 साली गांधींच्या योगदानावर प्रो. वॉप्स मूलर यांनी ‘गांधींचे विचार भारताला लागू पडत असतील, पण पाश्चात्य संस्कृतीत या विचारांना फारसे महत्व नाही’, अशा आशयाचा अहवाल सादर केल्यामुळे गांधींना नोबेल मिळाला नाही.
त्यानंतर 1938 आणि 1939 साली ‘महात्मा गांधींचे आंदोलन अहिंसक आहे, मात्र कधीही ते हिंसक मार्गाने पेटू शकते’, अशा प्रकारची कारणे दिल्यामुळे महात्मा गांधींचे नाव नोबेल पुरस्कारासाठी नाकारण्यात आले.
त्यानंतर 1947 साली नोबेल समितीच्या 5 पैकी 3 सदस्यांनी महात्मा गांधींविरोधात मतदान केले. या विरोधी मतदान करण्यामागे भारत-पाकिस्तान फाळणीचे कारण देण्यात आले. 1947 सालचे नोबेल ‘क्वेकर्स’ यांना मिळाले होते.
1948 साली नोबेल समिती पहिल्यांदा या निष्कर्षाला येऊन पोहोचली की, ‘महात्मा गांधीजी यांना मरणोत्तर पुरस्कार प्रदान करावा’, परंतु बक्षीस देणाऱ्या स्विडिश फाउंडेशनला हे मान्य नव्हते. त्यामुळे गांधींना पुरस्कार नाकारण्यात आला.
Comments are closed