पुुणे, दि. (Punetoday9news):- राष्टपिता महात्मा गांधी जयंती निमित्त विविध प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण विश्वविद्यालय अनुदान आयोग पश्चिम क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने डॉ. आर. मनोज कुमार, संयुक्त सचिव, यांच्या शुभ हस्ते करण्यात आले .
यावेळी मनोज कुमार यांनी सांगितले की “आमच्या कार्यालयाच्या वतीने महापुरुषांच्या जयंती निमित्त वर्षातून तीन वेळा असे उपक्रम वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन राबवले जातात आणि या सर्व वृक्षांचे संगोपन ही आमचे सर्व कर्मचारी सामाजिक बांधिलकी म्हणून करत असतो, आम्ही सर्वजण सुट्टीचा दिवस असुनही असे विधायक काम करून सामाजिक बांधिलकी जपत असतो. ” कोरोना महामारीच्या काळातही सर्वानी आपली काळजी घेऊन असे सामाजिक उपक्रम राबविण्याचे त्यांनी आवाहन केले.
यावेळी विनोद सिंग यादव, शिक्षा अधिकारी, डॉ. संजय नेगी, संजय. मारणे, विद्याधर खाटमोडे व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
Comments are closed