पिंपळे गुरव : २ ऑक्टोबर गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक २९ मध्ये सृष्टी चौक येथे स्थानिक नगरसेवक यांच्या संयुक्त विद्यमाने एकत्रित येऊन स्वच्छता अभियान राबविण्यात आले.या प्रसंगी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. स्वच्छता अभियानात नगरसेविका उषा मुंढे, चंदाताई लोखंडे, नगरसेवक सागर आंघोळकर, संजय गांधी निराधार योजनेचे संजय मराठे उपस्थित होते.
याप्रसंगी कोरोनाच्या संकट काळात आपले आरोग्य धोक्यात घालून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटप करून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सुनिल देवकर,आरोग्य निरीक्षक शांताराम माने,महापालिकेचे इतर कर्मचारी व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments are closed