IPL,दि. ३(punetoday9news):- यंदाच्या आयपीएल मधील चेन्नईची सातत्याने होणारी हार पाहून त्याच्या  चाहत्या वर्गाची घोर निराशा झाली आहे. त्यातही धोनी लागोपाठ दोन सामन्यात मैदानात असूनही चेन्नई सुपर किंग सामना हरले असल्याने धोनीच्या खेळीबद्दल शंका उपस्थित करीत धोनी आता खरोखरच दमलाय का ? असेही बोलताना धोनीचा चाहता वर्ग दिसत आहे.

हैदराबाद विरुध्दच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग ची  सुरूवात अत्यंत खराब झाली. सलग तिसऱ्या सामन्यात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. सनराईजर्स हैदराबादने चेन्नई सुपरकिंग्जवर ७ धावांनी मात केली. मुंबई इंडियन्सला पराभूत केल्यानंतर चेन्नईला राजस्थान, दिल्ली आणि हैदराबादने पराभूत केले. १६५ धावांचा पाठलाग करताना हैदराबादच्या गोलंदाजीपुढे चेन्नईच्या फलंदाजांची चांगलीच दमछाक झाली. मैदान गाजवणारे म्हणुन ओळखले जाणाऱ्या खेळाडूंना  मोठे फटके मारता आले नाही. धोनी – जडेजाने शेवटी फटकेबाजीचे केलेले प्रयत्नही निष्फळ ठरले. कारण त्याचे विजयात रुपांतर करता आले नाही व चेन्नईला १५७ धावांपर्यंतच मजल मारता आली.

हैदराबादने दिलेल्या १६५ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नईची सुरवात खराब झाली. तिसऱ्याच ओव्हरमध्ये शेन वॉटसन १ धाव करत माघारी परतला. त्यांनंतर अंबाती रायडूही ८ धावा करत स्वतातच परतला. फॉर्ममध्ये असलेल्या डु-प्लेसिस रन आऊट झाला. केदार जाधवही ३ धावा करुन बाद झाला. त्यानंतर रविंद्र जाडेजा आणि महेंद्रसिंह धोनी चांगली खेळी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यापर्यंत नेले. दोघांनी ७२ धावांची पार्टनरशीप केली. रवींद्र जाडेजाने ५० धावांची तर धोनीने ४७ धावांची नाबाद खेळी केली. हैदराबादकडून टी. नटराजनने २, भुवनेश्वर कुमारने १ तर अब्दुल समादने १ विकेट घेतली.

 

Comments are closed

error: Content is protected !!