पिंपरी, दि. ३ ( punetoday9news):- हैदराबाद मुक्ती संग्रामाचे प्रणेते, महाराष्ट्र राज्य निर्मितीचे शिल्पकार स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचे, त्यागाचे स्मरण करुन त्यांना अभिवादन .

त्यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील सिंदगी या ठिकाणी झाला तर शिक्षण सोलापूर येथे झाले. पुढे व्हिजन साप्ताहिक साठी लेखनही केले. महाराष्ट्र परिषदेचे चिटणीस म्हणून स्वामी काम पाहत होते. यासाठीची चळवळ अनेक वर्षे चालली होती. २७ ऑक्टोबर, १९३८ रोजी स्वामी रामानंद सत्याग्रहासाठी कार्यकर्त्यांसह हैदराबाद शहरातील राजमार्गावर आले. त्यांना अटक झाली होती. ते सुमारे चार महिने कारावासात होते.

स्वामीजींनी हैदराबाद संस्थानातल्या मराठी, तेलुगू, कन्नड अशा भिन्न भाषिकांना एकत्र आणून हैदराबाद मुक्तीचा लढा लढला. हैदराबाद संस्थानाचे भारतातले विलिनीकरण, मराठवाडा मुक्ती संग्रामातले यश, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती या ऐतिहासिक घटनांमागे स्वामीजींची दूरदृष्टी, प्रेरणा, त्याग आहे.

एस. एम्. जोशींनी ‘प्रादेशिक ऐक्य व लोकशाहीसाठी स्वामीजींचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहावे लागेल’ असा त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

स्वामींच्या स्मृतिप्रीत्यर्थ नांदेड येथील विद्यापीठाला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ असे नाव दिले आहे.

व्यंकटराव डावळे प्रतिष्ठान व राज्य सरकार यांच्यातर्फे अंबाजोगाई येथे चालविल्या जाणाऱ्या महाविद्यालयाला स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय असे नाव दिले आहे.

उस्मानाबाद येथे स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमाला चालवली जाते.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!