मुंबई ,दि. ३( punetoday9news):- अभिनेता सुशांतसिंगने आत्महत्या केली यावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे अंतिम रिपोर्ट सोपवला आहे. त्यातून ही बाब उघड झाली आहे.
एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला असून हत्येचा दावा फेटाळला आहे. तसेच रिपोर्टमध्येदेखील हत्येचा दावा नाकारण्यात आला आहे.
सुशांतच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्त्वाखाली तज्ञ डॉक्टरांची टीम काम करत होती. या टीमने सर्व अभ्यास करून सीबीआयकडे रिपोर्ट सोपवला होता.
पोस्टमॉर्टम तसंच व्हिसेरो रिपोर्टचा अभ्यास करण्यासाठी सीबीआयने एम्स रुग्णालयाकडे विनंती केली होती. त्यानुसार सदरील तपास करून अहवाल तयार करण्यात आला.
एम्सच्या रुग्णालयाकडून मिळालेली माहिती व रिपोर्ट आणि सीबीआय तपास यांची पडताळणी करण्याचे काम सुरु असून एम्सच्या डॉक्टरांना साक्षीदार म्हणूनही उभे केले जाऊ शकते.
Comments are closed