मुंबई ,दि. ३( punetoday9news):- उत्तर प्रदेश मधील अत्याचार प्रकरणावर बोलताना ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा साधत चांगलाच खरपूस समाचार घेतला त्याचबरोबर काही दिशाहीन वृत्तांकन करणाऱ्या हिंदी भाषिक पत्रकारांना खडे बोल सुनावले.
ते म्हणाले महाराष्ट्रातील मराठी पत्रकार चहा बिस्कीट खाईल मात्र आपला स्वाभिमान विकणार नाही.
https://twitter.com/RRPSpeaks/status/1312251902831194112?s=19
त्याचबरोबर मागील काही काळापूर्वी महाराष्ट्राची जाणीवपूर्वक व्यक्तिगत पातळीवर बदनामी करणाऱ्या एका वृत्तवाहिनीचा व्हिडिओ ही त्यांनी ट्विट केला असून त्यांनी अशा पद्धतीने होणाऱ्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रोहित पवार यांनी उत्तर प्रदेश मधील घडलेल्या घटनेवर बोलताना सांगितले की उत्तर प्रदेश मध्ये अत्याचार झालेल्या पीडित कुटुंबीयांना कोणालाही भेटू दिले जात नाही तसेच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस दल तैनात करण्यात आल्याने छावणीचे स्वरूप आले आहे. मीडियाला तेथे जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यातही एक हिंदी वृत्तवाहिनी महिला पत्रकार कशा पद्धतीने आपला पत्रकारितेचा प्रामाणिकपणा दाखवत उत्तम कार्य करत आहे याचे उदाहरण देत कौतुकही केले.
Comments are closed