पिंपरी, दि. ३ ( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी व पिंपळे गुरव परिसरात “माझे कुटुंब माझी जबाबदारी” अंतर्गत होत असलेल्या सर्वे मध्ये कर्मचाऱ्यांकडून नियमांची पायमल्ली होत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.
या सर्वे साठी लोकप्रतिनिधी व प्रशासन अधिकारी मनापासुन झटत असताना काही कर्मचारी वर्गाकडून मात्र स्वतःच नियमांचे उल्लंघन केले जात असल्याने रोष व्यक्त केला जात आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचारी वर्गासही टिकेचे धनी होण्याची वेळ आली आहे.
आरोग्य विभागाने कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षा साधने दिलेली असतांनाही त्याचा वापर होत नाही असे नागरिकांचे मत आहे. तसेच यामुळे नागरिकांना कोरोना संसर्ग होण्याची संभावना उत्पन्न होते. तपासनीसाठीची उपकरने ही सॅनिटाइज होत नसल्याचे मत एका महिला नागरिकाने मांडले आहे. ओळखपत्र ही सोबत नसल्याचे काहींचे म्हणणे आहे
काही दिवसांपूर्वीच एका वृत्तपत्रानेही याची दखल घेत पिंपळे गुरव येथील रूग्णालयाशेजारी या कर्मचाऱ्यांकडून झालेल्या गर्दीची बातमी छापून सोशल डिस्टन्सिंग चा फज्जा दाखवला होता. तरीही यात सुधारणा दिसून येत नाही त्यामुळे “माझे कुटुंब माझी जबाबदारी” हे न होता “माझे कुटुंब तुमच्यामुळे आजारी” व्हायचे. असे नागरिक बोलू लागले आहेत.
Comments are closed