पिंपरी, दि. ४ (punetoday9news):- इसवी सन १९३१ मध्ये फ्लोरेंस,इटली येथे आंतरराष्ट्रीय पशु संरक्षण संमेलना मध्ये ४ ऑक्टोबर जागतिक पशु दिवस म्हणून पाहण्यासाठी एक संकल्पना मंजूर करण्यात आली.त्यानंतर सर्व जगामध्ये ४ ऑक्टोबर हा जागतिक पशु दिन म्हणून साजरा केला जातो.
या जागतिक पशु दिनाचे औचित्य साधून कोणी ना कोणी काही ना काही कार्यक्रम घेतले जातात. पिंपळे गुरव येथे ही विजूशेठ जगताप यांचे पशुप्रेम पाहण्याजोगे आहे. त्यांनी शहरातील सिमेंटच्या जंगलातही आपले प्राणीप्रेम जपत पशुपालन केले आहे.
त्यांनी या मध्यवर्ती ठिकाणी एक सुसज्ज गोशाळा तयार केली आहे. त्याबरोबर तेथे एक घोड्यांचा तबेला , शेळ्या- मेंढ्या व एक छोटे कुकुट पालन सुद्धा केले आहे. त्यांच्या सर्व नियोजनाला पाहिले असता वाटते की शहरी भागातही ग्रामीण परंपरा कायम आहे. मन अगदी प्रसन्न होऊन जाते.
त्यांच्या या प्राणी प्रेमाची चर्चा तर होतेच शिवाय सर्व स्तरावरून कौतुकही होत असते.
Comments are closed