पुणे, दि. ४ (punetoday9news):- भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मेश्राम यांनी जगभरातील बहुजन समाजाला संघटित करून त्यांना हक्क- अधिकाराची जाणीव निर्माण करून दिली. इतिहास आणि वर्तमानाचे शास्त्रशुद्ध विश्लेषण करून आंतरराष्ट्रीय स्तरावरचे संघटन उभारले आहे.
राज्यस्तरीय अधिवेशनाचा उद्घाटक म्हणून श्रीमंत कोकाटे यांना निमंत्रित करण्यात आले होते. याप्रसंगी शिवचरित्रावर पीएच.डी. मिळविल्याबद्दल श्रीमंत कोकाटे यांचा महात्मा फुले फेटा, वामन मेश्राम यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा संच भेट देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रीय महासचिव डी. आर. ओहोळ, राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश पाटील, राष्ट्रीय प्रभारी कुमार काळे, राष्ट्रीय उपाध्यक्ष एड. राहुल मखरे, ज्ञानेश्वर कौले, सारंग कथलकर इत्यादी मान्यवर ऑनलाइन उपस्थित होते.
हा सन्मान छत्रपती शिवाजी राजे, फुले-शाहू-आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाचा, विचारांचा सन्मान असल्याचे मत शिवव्याख्याते श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केले . या अधिवेशनासाठी देश-विदेशातून सुमारे एक लाख कार्यकर्त्यांनी हजेरी लावली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन बनसोडे यांनी केले.
Comments are closed