पिंपरी,दि.४ ( punetoday9news ) नेहमीच्या कालगणनेप्रमाणे आतापर्यंत नवरात्र सुरु व्हायला हवे होते , पुढचा महिना ‘खरा आश्विन’ महिना असेल म्हणजेच त्या आश्विन महिन्याच्या आधी या वर्षी हा ‘एक्स्ट्रा’ महिना आला आहे. यालाच आपण अधिक मास (महिना) असे म्हणतो.

शालिवाहन शकाच्या कालगणनेप्रमाणे,

▪️ चैत्र, वैशाख हे भारतीय महिने चंद्राच्या गतीप्रमाणे व नक्षत्रांवरून मोजले जातात. त्यांना चांद्रमास म्हणतात.

▪️ चंद्र पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा २८ दिवसांत पूर्ण करतो. अर्थात त्यानुसार सौर वर्षाप्रमाणे चांद्रवर्षाचे १२ महिन्यांचे ३६५ दिवस न भरता ते ३५५ भरतात.

चांद्रमासाच्या वर्षाचे दिवस (चांद्रगणना) व सौर वर्षाचे दिवस (सौरगणना) यांचा ताळमेळ घालण्यासाठी साधारणत: दर ३ वर्षांनी म्हणजेच सुमारे साडेबत्तीस महिन्यांनी (३२ महिने १६  दिवस ४ घटिकांनी) एक चांद्रमास दोनदा मोजतात आणि त्यालाच ‘अधिक मास’ म्हणतात. ज्या वर्षी हा अधिक मास येतो, ते चांद्रवर्ष १३ महिन्यांचे असते.

“ठराविक सण ठराविक ऋतूंमध्ये यावेत यासाठी आपली पंचांगे चांद्र-सौर पद्धतीवर आधारलेली आहेत. एका चांद्रवर्षात ३६०  तिथी, एका सौरवर्षात ३७१ तिथी होतात. त्यामुळे दरवर्षी ११ तिथी वाढत जाऊन त्या ३३ झाल्या की अधिकमास येतो.

Comments are closed

error: Content is protected !!