सावधान! तुम्हालाही असा मेसेज आलाय?

 सतर्क व्हा! ऑफर, भुलथापांना बळी पडू नका.

 

पिंपरी,दि. ५( punetoday9news):- महाराष्ट्रातील सर्व गावं, खेडी, शहरे यामध्ये मोबाईलचे जाळे तयार झाले आहे याचाच गैरफायदा ऑनलाइन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी घेत ऑनलाइन गंडा घालण्याचे प्रमाण वाढत आहे.

काही ठिकाणी प्रत्यक्ष कॉल करून लोकांना लॉटरी लागली असल्याचे सांगत तर काही ठिकाणी ऑफर द्वारे तुमची निवड झाल्याची माहिती एसएमएसद्वारे देत लाखो रुपये मिळणार असल्याच्या भूलथापा या भामट्यांकडून केल्या जातात.व जास्त पैशाच्या हव्यासापायी काही नागरिक या भूलथापांना बळी पडतात.

महाराष्ट्रातील सायबर सेलच्या वतीने वारंवार सूचना देऊनही नागरिक अशा प्रकारच्या दिलेल्या आमिषाला बळी पडत आहेत व स्वतःचे बँक खाते रिकामे करून घेत आहेत. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातही असे प्रकार घडल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत.

हे भामटे आज-काल नवीन पद्धत अवलंबत आहेत यामध्ये नागरिकांना बल्क मेसेज ऐवजी साधा टेक्स्ट मेसेज करून तुम्हाला अमुक-तमुक रुपयांची ऑफर मिळाली असून खालील लिंक वर क्लिक करा अथवा तुमचा नंबर सिलेक्ट झाला असून तुम्हाला लाखो रुपये मिळणार आहेत त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा असे मेसेज पाठवत आहेत. बरेचदा नागरिकांना  या मेसेज मध्ये काही गैरप्रकार नसून एकदा पहायला काय हरकत आहे असा विचार करून बळी पडत आहेत.

नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते त्यामुळे पुणे पोलीस प्रशासनाद्वारे ही वारंवार सूचना केलेल्या आहेत त्यामुळे अशा पद्धतीचे मेसेज तुम्हालाही येत असतील तर ते ताबडतोब डिलीट करावेत व त्यांना कसल्याही पद्धतीचा प्रतिसाद देऊ नये तसेच नजीकच्या पोलिस स्टेशनमध्ये सुद्धा याची माहिती दिल्यास अशा ऑनलाइन गुन्हेगारास ताबडतोब जेरबंद करता येऊ शकेल तसेच आपल्या कष्टाच्या पैसे सुरक्षित ठेवता येऊ शकेल.

 

Comments are closed

error: Content is protected !!