पिंपळे गुरव,दि.५(punetoday9news )  :- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव  येथील काळूराम जगताप बॅडमिंटन हॉल येथे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील स्वच्छता कर्मचारी,औषध फवारणी कर्मचारी,मुकादम यांना सुरक्षा साधन व  वाफेचे मशीनचे  प्रभाग ३१ मधील नगरसेविका, नगरसेवक यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
माजी स्थायी समिती अध्यक्ष राजेंद्र राजापूरे यांच्या मातोश्री तसेच नगरसेविका माधवी राजापूरे यांच्या सासू कै.सुशीला शंकर राजापुरे यांच्या स्मरणार्थ काटेपुरम चौक येथील काळूराम जगताप बॅडमिंटन हॉल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र राजापुरे म्हणाले कि , कोरोनाच्या संकट काळात महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे तसेच अजूनही बजावत आहेत .अशा खडतर प्रसंगी आपण आपले आरोग्य धोक्यात घालून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहात . आपले कार्य बहुमूल्य आहे. तसेच इतरांसाठी प्रेरणादायी आहे .

याप्रसंगी नगरसेवक अंबरनाथ कांबळे,नगरसेवीका माधवी राजापुरे,माजी स्थायी समिती अध्यक्ष राजेंद्र राजापुरे, संजय गांधी निराधार योजनेचे संजय मराठे, भाजपचे प्रभाग ३१ चे अध्यक्ष मारुती कवडे, सांगवी-काळेवाडी मंडल भाजपचे उपाध्यक्ष डॉ. देवीदास शेलार, सुरेश शिंदे, अतुल पवार, श्रीकांत पवार, चिटणीस भाऊसाहेब जाधव, शामराव धस, राजू सोनवणे, प्रमुख बाजीराव मागाडे, युवा उपाध्यक्ष प्रणव ढोरे, साई कोंढरे, अभिजीत बागुल तसेच सामाजिक कार्यकर्ते सुभाष पवार, शिवाजी घोडके, शिवाजी पोवार, ज्ञानदेव गोरे, रशीद पठाण तसेच महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी रमेश भोसले, मुख्य आरोग्य निरीक्षक अजय जाधव,आरोग्य निरीक्षक उध्दव डवरी, संजय मानमोडे, सुनिल चव्हाण,दशरथ बांबळे, आरोग्य मुकादम विकास कांबळे, आनंदा फंड, कविता गोहेर आदी यावेळी उपस्थित होते.

माजी नगरसेवक राजेंद्र राजापुरे यांनी उपस्थितांचे  आभार मानले.

Comments are closed

error: Content is protected !!