ipl,दि.५ ( punetoday9news) :-
बोटाला झालेल्या दुखापतीमुळे दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा यंदाच्या हंगामातील उर्वरित मॅचेस खेळू शकणार नाही.
पहिल्यावहिल्या जेतेपदासाठी प्रयत्नशील दिल्ली कॅपिटल्स संघाकरता हा मोठा धक्का आहे. ३७ वर्षीय मिश्रा हा दिल्ली संघाचा अविभाज्य भाग होता.
३ ऑक्टोबर रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या लढतीत स्वत:च्या बॉलिंगवर कॅच घेताना मिश्राच्या बोटाला दुखापत झाली. गोलंदाजी करण्याच्याच उजव्या हाताला ही दुखापत झाली. दुखापतीचे स्वरुप गंभीर असल्याचे एक्सरे चाचण्यांमध्ये स्पष्ट झाले आहे .
आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत अमित मिश्रा दुसऱ्या स्थानी आहे. आयपीएलच्या दीडशे सामन्यामध्ये मिश्राच्या नावावर १६० बळी आहेत.
स्पर्धेचे सगळे हंगाम खेळणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये अमित मिश्राचा समावेश होतो. आयपीएल स्पर्धेत तब्बल तीन हॅट्ट्रिकचा दुर्मीळ विक्रमही मिश्राच्या नावावर आहे.
Comments are closed