मुंबई,दि.५ (punetoday9news ) :- शिवसेनेची ५३ वर्षांची दसरा मेळाव्याची परंपरा आहे.मात्र या वर्षी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे काय होणार याची उत्सुकता शिवसैनिकांना लागली आहे . दरवर्षी त्यासाठी हजारो शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी शिवाजीपार्कवर दाखल होतात.
राज्यात नोव्हेंबर २०२० मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आणि उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुखही आहेत. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा हा शिवसेनेसाठी महत्वाचा आहे.
कोरोनाच्या संकटामुळे सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवर शिवसैनिकांना एकत्र जमता येणार नाही. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा रद्द होणार की वेगळ्या पध्दतीने केला जाणार हा प्रश्न हजारो शिवसैनिकांच्या मनात आहे.
याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. पण हा दसरा मेळावा व्हर्च्युअल पध्दतीने होणार असल्याचे सांगितले जात आहे.
बाळासाहेबांचे शिवाजी पार्कवर प्रचंड प्रेम होते . बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी पार्क या दोघांचा जन्म एकाचवेळी झाल्याचे खूप कमी जणांना माहिती असल्याचे ‘ठाकरे विरुद्ध ठाकरे’ पुस्तकाचे लेखक आणि पत्रकार धवल कुलकर्णी सांगतात. “शिवाजी पार्कला पूर्वी ‘माइन पार्क’ असे संबोधले जात होते . १९२७ साली या मैदानाचे नाव शिवाजी पार्क करण्यात आले व याच साली बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला होता.”
त्यामुळे यंदा चा दसरा मेळावा कसा होणार याची उत्सुकता सर्व शिवसैनिकांच्या मनात निर्माण होऊ लागली आहे .
Comments are closed