सातारा, दि.६ (punetoday9news) :- यावर्षी शासन सोयाबीनसाठी राज्यात ३ हजार ८८० हमी भाव देणार असून येत्या १५ ऑक्टोबर पासून राज्यात खरेदी केंद्र सुरु होतील, अशी माहिती राज्याचे पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
राज्यात यावर्षी चांगला पाऊस झाला हा पाऊस आताही सुरु आहे. राज्यातील सोयाबीनचे पिक काढणे व मळणी काम अंतिम टप्यात आहे. काही शेतकरी आपला माल लवकरात लवकर विकावा यासाठी खासगी व्यापाऱ्यांकडे जात आहेत तरी शेतकऱ्यांनी राज्य शासनाने सुरु केलेल्या खरेदी केंद्रावर आपला माल विकावा, असे आवाहन सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.
राज्यात अजूनही पाऊस पडत आहे त्यामुळे सोयाबीनला ओलसरपणा येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी काढलेल्या सोयाबीन विक्रीची घाई करु नये. सोयाबीनला राज्य शासनाने ३ हजार ८८० रुपये भाव दिला आहे. राज्य शासनाकडून १५ ऑक्टोबर पासून सोयाबीनची खरेदी करण्यात येणार आहे. राज्य शासनाने सुरु केलेल्या खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करुनच शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री करावी, असे आवाहनही सहकारमंत्री पाटील यांनी केले आहे.
Comments are closed