दिल्ली , दि.६(punetoday9news ) :- केंद्र सरकारने अनलॉक ५ अंतर्गत देशातील चित्रपटगृहांना परवानगी दिली आहे. मात्र, यासाठी काही अटी-शर्ती घालून दिल्या आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नवी दिल्लीतील पत्रकारपरिषदेत याबद्दलची माहिती दिली. त्यानुसार आता चित्रपटगृहांचे मालक आणि प्रेक्षकांना काही नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.
या नियमावली नुसार पुढील नियमांचे पालन करावे लागणार आहे .
१. चित्रपटगृहाच्या एकूण आसनक्षमतेच्या ५० टक्केच जागांवर प्रेक्षकांना मुभा. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांमुळे उर्वरित जागा रिक्त ठेवाव्या लागणार.
२. प्रेक्षकांना नेहमीप्रमाणे एकमेकांच्या बाजूला बसता येणार नाही. प्रत्येक प्रेक्षकामध्ये एका आसनाचे अंतर राखणे अनिवार्य
३. रिकाम्या आसनांवर ‘Not to be occupied’ स्टिकर लावणे बंधनकारक.
४. चित्रपटगृहात प्रवेश केल्यानंतर प्रेक्षकांना तोंडावर मास्क लावणे बंधनकारक असेल.
५. चित्रपटगृहात हात धुण्यासाठी आणि हँड सॅनिटायझर्सची व्यवस्था असणे अनिवार्य असेल.
६. चित्रपटगृहात येणाऱ्या प्रेक्षकांना आरोग्य सेतू ऍप वापरण्याचा सल्ला द्यावा.
७. चित्रपटगृहात येण्यापूर्वी प्रेक्षकांचे थर्मल स्कॅनिंग करावे. कोरोनाची लक्षणे नसलेल्या प्रेक्षकांनाच आतमध्ये प्रवेश द्यावा.
Comments are closed