पुणे, दि. ६ (punetoday9news ) :- पुण्यातील पुणे बंगलोर हायवे वर नवले पुलानजीक ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने जवळपास पंधरा गाड्या एकमेंकावर धडकत विचित्र अपघात झाला आहे . या अपघातात  एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.

स्थानिकांनी पोलिसांना बोलावल्यानंतर या अपघाताची चौकशी सुरु करण्यात आली आहे .सकाळी साडेदहाच्या सुमारास हा अपघात घडला असून   काही नागरिकांच्या मते ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून त्याने पाठीमागून वाहनास धडक दिली त्यामुळे इतर वाहने एकमेकांस धडकत हा विचित्र अपघात घडला . या अपघातामुळे रस्त्यावर  प्रचंड कोंडी होऊन वाहतुकीचा झाला आहे तसेच एका बाजूची वाहतूक आली आहे.  क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्याचे काम चालू आहे .

भारती विद्यापीठ पोलीस अपघाताची चौकशी करत आहेत.

Comments are closed

error: Content is protected !!