मुंबई,दि. ७( punetoday9news):-   भोर विधानसभा मतदार संघातील (जि. पुणे) विजेचे विविध समस्या तातडीने सोडविण्यात येतील. तसेच वेल्हा व मुळशी तालुक्यात पाऊस अधिक पडत असल्याने पोल गंजण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या डोंगरी भागाचा विचार करता कोकणाप्रमाणे गंजरोधी ‘जीआय’ पोल देण्यात यावे असेही निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.

मुंबई येथील महावितरणच्या मुख्यालयात भोर विधानसभा मतदार संघातील विविध प्रश्न, नवीन उपकेंद्र व वीज यंत्रणेचे सक्षमीकरण आदी मुद्द्यांवर बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी भोरचे आमदार संग्राम थोपटे, महावितरणचे संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत यांची प्रमुख उपस्थिती होती. तर व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारे महापारेषणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे, महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, मुख्य अभियंता सुनील पावडे, सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील व राजेंद्र पवार आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सध्या महावितरणचा भोर उपविभाग हा बारामती परिमंडलाच्या कार्यक्षेत्रात आहे. मात्र वीजग्राहकांच्या दृष्टीने हे गैरसोयीचे असल्याने भोर उपविभाग हा पुणे परिमंडलामध्ये समाविष्ट करावा अशी मागणी आमदार संग्राम थोपटे यांनी केली. याबाबत अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी पुणे प्रादेशिक संचालकांना दिले.

 

Comments are closed

error: Content is protected !!