कोरोना व्हायरस च्या वाढत्या पराभवानंतर भारतात बॉयकॉट चायनीजचा सोशिअल मीडिया वर ट्रेंड सुरु झाला होता . भारतीय वस्तू वापर भारतीय व्यापाऱ्यांचा फायदा होऊ द्या सारखे मेसेज मोबाईल वर सर्वत्र फिरत होते . हे पाहून कदाचित काही नागरिकांना वाटलंही असेल कि आता भारतात फक्त भारतीय वस्तूच विकल्या जाणार व ग्राहकहि फक्त भारतीय वस्तूच खरेदी करणार . पण सद्यस्थिती पाहता गरजेल तो बरसेल काय असं म्हणायची वेळ आली आहे कारण सध्या भारतीय बाजारपेठेत चिनी मोबाइलला भलतीच मागणी दिसून येतेय . त्यामुळेच या कंपन्या भारतात मोबाईल विक्रीचे नवनवीन उचांक बनवत असताना पाहायला मिळत आहे. देशभरात सध्याच्या घडीला शाओमी, रेडमी, रियलमी, वनप्लस, पोको, वीवो आणि ओप्पो या चिनी ब्रॅण्डसच्या मोबाईलची विक्री मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मग भारत विषयी या ग्राहकांचे प्रेम फक्त सोशिअल मीडिया पुरतेच मर्यादित आहे का असा प्रश्न उपस्थित होतो.
रियलमीच्या नुकत्याच लाँच झालेल्या नारजो २० सीरीज या स्मार्टफोनने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. बुधवारी कंपनीने जाहीर केलेल्या माहितीनुसार नारजो २० सीरीजचे २.३१ लाख मोबाईल विकले गेले आहेत. तर पोको एम २ या मोबाईलच्या विक्रीसाठी कंपनीने १५ सप्टेंबर रोजी पहिल्या सेलचे आयोजन केले होते. या फोनच्या पहिल्याच सेलमध्ये १.३० लाख पोको एम २ या मोबाईल्सची विक्री झाली आहे.पोको एम २ या मोबाईलच्या विक्रीसाठी कंपनीने १५ सप्टेंबर रोजी पहिल्या सेलचे आयोजन केले होते. या फोनच्या पहिल्याच सेलमध्ये १.३० लाख पोको एम २ या मोबाईल्सची विक्री झाली आहे.दरम्यान रेडमीचा नोट ९ या फोनचीदेखील मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. त्यामुळे हा फोन सध्या आऊट ऑफ स्टॉक आहे.
आता हि आकडेवारी पाहून नक्की भारतीयांना म्हणायचं काय, असा प्रसन्न देशप्रेमींना पडला नाही तर नवलच !
Comments are closed