पुणे, दि. ८ ( punetoday9news):- वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दहा तारखेला पुकारलेल्या बंदला पाठिंबा देत दोन्ही राजांवर जहरी टीका केली आहे.
पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले ओबीसी आरक्षणाला हात न लावता आरक्षण द्यावे माझा मराठा आरक्षणास पाठिंबा आहे मात्र नेतृत्वावरून होत असलेल्या प्रकारावर प्रश्नचिन्ह निर्माण करत दोन्ही राजांवर टीका केली आहे. दोन्ही राजांवर नाव न घेता ही टीका केली आहे ते म्हणाले एका राजास भाजपने कसे घेतले हा प्रश्न आहे त्यांना राज्यघटना माहीत नाही तर दुसरे राजे मराठा आरक्षणाच्या मुद्दा पेक्षा इतर मुद्द्यांवर जास्त लक्ष देत आहेत.
या प्रतिक्रियेनंतर महाराष्ट्रातील सर्व स्तरातून त्यांच्या या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला जात आहे.
Comments are closed