पिंपरी, दि. ९ ( punetoday9news):- आज कोरोना काळामुळे नागरिक आरोग्याकडे लक्ष द्यायला लागले आहेत मात्र काही दिवस व्यायाम केल्याने अचानक प्रतिकारशक्ती वाढत नाही तर नियमित व्यायाम करून काटक शरीर कमवणे गरजेचे आहे.
अशाच पद्धतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे या व्हिडिओमध्ये आजी हरिहर गड सर करताना पाहायला मिळत आहेत सर्वसाधारणतः उतार वयामध्ये लोक घरामध्ये एकाच जागी स्वस्थ बसण्याला प्राधान्य देत असतात मात्र या आजींची जिद्द पाहून सर्व स्तरातून वाहवा होत आहे. कारण या आजी चक्क हरिहर गडाची चढाई करताना दिसत आहेत. हरिहर गड हा चढाईसाठी अतिशय कठीण मानले जाणाऱ्या गडा पैकी एक असल्याने अशा गडाची चढाई आजी करत आहेत हे नव युवकांसाठी एक प्रेरक कार्य म्हणावे लागेल.
विडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Comments are closed